मराठी लेखकांसाठी

मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर आपले सहर्ष स्वागत. मराठी-मंडळीवर असणारी ही सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठीच हा वेगळा प्रयत्न आहे.

माझा ब्लॉग इथं सापडला नाही! आपला ब्लॉग इथे कसा जोडाल?काय सांगता? मराठी ब्लॉगर्स चर्चासत्रावर सदस्यांचे ब्लॉग इथे जोडलेले आहेत. मराठीब्लॉगर्स वर विषेशतः १ ऑक्टोंबर २०११ पासुनचे लेखन दाखवण्याचे सोय केली आहे. काही लेख जुनेही आहेत त्यामुळे आपलं नाव किंवा पोस्टमधी एखाद-दुसरा शब्द मराठीब्लॉगर्स शोधुन पहा. मात्र नाहीच सापडल्यास, आपल्या ब्लॉगचा दुवा आम्हांस संपर्क या पानावरुन पाठवा.

ब्लॉग लेखनासंबंधीत काही माहिती:
लेखाला नाव – टायटल जरुर द्या.
बर्‍याचदा लिहिण्याच्या घाईत वा अनावधानाने आपण लेखाला नाव – टायटल द्यायला विसरतो. असे लेख नाव – टायटल शिवाय ओळखणे आणि पाहणे दोन्हीही अवघड होते.
छोटं मात्र उठुन दिसणारं टायटल [ते म्हणतात ना - कॅची!] वाचकांना लेख वाचण्याची भुरळ घालतं. त्यामुळे आपण लिहिलेल्या लेखाला समर्पक व योग्य असे नाव – टायटल जरुर द्या ज्यामुळे आपला लेख वाचकांना समजण्यास सोपं होईल.


Post a Comment

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आपली प्रतिक्रिया आणि उत्तर लवकरच प्रकाशित करु.

आभार,
मराठी ब्लॉगर्स

0 comments: